','

' ); } ?>

Mahashivratri   2023

 

महाशिवरात्री ची पुराणकथा –  Mahashivratri Story

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्वपुर्ण गोष्टींची निर्मीती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातुन हलाहल विष देखील बाहेर आले.

 

या विषात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रम्हांडाला वाचवले.

 

पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपुर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपुर्ण रात्र जागुन काढण्याचा उपाय सांगितला.

 

सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणुन रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशिर्वाद दिला. या संपुर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणुन या दिवसाला महाशिवरात्री असे म्हंटले जाते.

 

अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.

 

महाशिवरात्री या दिवशी भाविक संपुर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलिलामृत, महारूद्र, भजन, गायन इत्यांदिचे आयोजन केले जाते. भगवान शिवाचे दर्शन घेउन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरीता आराधना केली जाते.

 

शिवाच्या मंदिरांमधे महाशिवरात्रीला मोठया संख्येने भाविकांची गर्दी दिसुन येते.

 

बारा ज्योर्तिलिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात.

 

भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तिर्थक्षेत्र आहेत तेथे मोठयामोठया यात्रा भरतात.

 

शिवशंकराला 108 बेल वाहुन शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटेधोत्र्याचे फुल भगवान शंकराला वाहाण्याची देखील पध्दत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहाण्याची परंपरा आहे.

 

शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ हा जप जास्तीत जास्त करावा . . . .

 

भगवान शिवाला ‘भोळा शंकर’ देखील म्हंटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरीत प्रसन्न होणारा आणि ईच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे. शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी . . .

 

शिवपुराणातील कथा – Shiv Puran Story

 

एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला

 

‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.

 

दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.

 

सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

 

हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’

 

त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’

 

ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.

 

देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.

 

सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . . .

 

Mahashivrati wishes in Marathi:

 

ॐ त्रियम्बकं यजामहे,सुगन्धिं पुष्टिवर्धनं !उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मोक्षिय मामृतात् ! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

काल पण तूचमहाकाल पण तूचलोक ही तूचत्रिलोकही तूचशिव पण तूचआणि सत्यही तूच जय श्री महाकाल हर हर महादेव.

 

कैलासराणा शिव चंद्रामौळीफणीद्रं माथा मुकुटीं झळाळीकारुण्यसिंधु भवदु:खहारीतुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

 

बेलाचे पान वाहतो महादेवाला,करतो वंदन दैवताला ,सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांनाहिच प्रार्थना शिव शंभो शंकराला महाशिवराञी च्या शुभेच्छा.ॐ नमः शिवाय.

 

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..तुज विण शंभु मज कोण तारी हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

 

तुमच्या आयुष्यातील सर्वदुःख पळून जावो,महादेवांच्या कृपेने सुख तुमच्या दारी येवो..तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालामहाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.

 

Mahashivratri wishes in Hindi:

 

शिव की भक्ति से नूर मिलता है

सबके दिलों को सुकून मिलता है

जो भी लेता है दिल से भोले का नाम

उसे भोले का आशीर्वाद जरूर मिलता है

जय भोलेनाथ

महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनायें

 

भोले की महिमा है अपरम्पार

करते हैं अपने भक्तों का उद्धार

शिव की दया आप पर बनी रहे

और आपके जीवन में खुशियां भरी रहें

 

शिव की शक्ति

शिव का जाप

और खुशियों का संसार मिले

इस शिवरात्रि के उत्सव पर

आपको कामयाबी की नयी शुरुआत मिले

 

Maharashivtari wishes in Sanskrti:

 

  • ओम, मैं देवताओं के महानतम, आदर्श पुरूष, महादेव पर ध्यान करता हूं।
    भगवान रुद्र, बुद्धि के साथ हमें आशीर्वाद दें और ज्ञान के साथ उजागर करें।।
  • ॐ नमो भगवते रूद्राय । Happy Maha Shivratri 2023।।
  • ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात ।
    Wishing you a very Happy Maha Shivratri 2023।।
  • करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसंवापराधं ।
    विहितं विहितं वा सर्व मेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो ।।
    Happy Shivratri 2023।।

 

  • ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्,
    उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।।
    Happy Maha Shivratri 2023।।

 

  • मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकन्ताय शंभवे,
    अमृतेषाय सर्वाय महादेवाय ते नमः।।
    Happy Shivratri 2023।।

 

  • कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।
    सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि ॥
    Happy Maha Shivratri 2023।।

 

  • May all your wishes be granted by Lord Shiva! Wish you and your family a very happy Maha Shivratri. Happy Maha Shivratri 2023.

 

Conclusion:

To know more read more above.

If u like this article you do like this Kargil vijay diwas quotes

And for more information en.wikipedia.org